मंगळवार, १२ एप्रिल, २०११

खरे सत्य चाला ..... धर्मनिरपेक्ष बुद्धी म्हणजे नेमके काय?


  भारत स्वतंत्र झाल्यापासून धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हे दोन शब्द सतत कानावर येत असतात..पण धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ हा आपल्या लोकांना पण कळला नाही आणि राजकारण्यांना तर नाहीच नाही...धर्मनिरपेक्षता हि संकल्पना बुद्धीवादावर आधारली आहे ; तर सर्वधर्मसमभाव हि संकल्पनाच चुकीची आहे...
  साधारणपणे आपल्याला या दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत असे वाटते....पण खोलात जाऊन विचार केला तर सर्वधर्मसमभाव ह्या कल्पनेमधील भंपकपणा आपल्या लक्षात येतो......सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्मांची मुलभूत तत्वे एकच आहेत आणि ती मानवतावादी आहेत...माझ्यामते हे सर्वात मोठे असत्य आहे.... सर्वधर्मसमभाव हि संकल्पना आपले राष्ट्रीय जीवनाला बाधा आणणारी आहे...मुसलमान लोकांना तुमचा धर्म सुद्धा  चांगला आहे असे सांगून राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ते जीवनच गढूळ करून टाकणे होय..
  जर हिंदुत्ववाद्यांना म्हणजेच राष्ट्रवाद्यांना या राष्ट्रात एकत्मिकार्नाची प्रक्रिया चालू करायची असेल तर त्यासाठी प्रथम धर्मनिरपेक्ष राज्य (secular state ) या बद्दलचे चुकीचे विचार नष्ट करायला पाहिजेत...हिंदुराष्ट्राची निर्मिती करणे म्हणजे मुसलमानांना आणि ख्रिश्चन  लोकांना भारतातून हाकलून देणे..याहून अधिक तर्कविसंगत आणि राष्ट्रीय भावनेला मारक असा विचार असू शकत नाही..त्या समाजाला आपल्या राष्ट्रीय प्रवाहात सामावून घेण्यासाठी सर्वप्रथम हिंदुनी सक्त धर्मनिरपेक्षता आत्मसात करायला हवी.....
  राष्ट्रवाद हा धर्मावर आधारलेला असूच शकत नाही....आपल्याला धर्मनिरपेक्ष  पण संस्कृती सापेक्ष राष्ट्रवाद हवा आहे......राष्ट्रवाद हा इतिहास संस्कृती या मुल्यांवर आधारलेला असतो...धर्म आणि संस्कृती या दोन गोष्टींमधील फरक ओळखून त्या दोन्ही गोष्टींमध्ये फारकत करून सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी धर्मनिरपेक्षता अत्यावश्यक आहे......
  मात्र इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मी कोणत्याही प्रकारे धर्मनिरपेक्ष समाजाची मागणी आत्ताच करत नाही .....समाज हा कधीच धर्मनिरपेक्ष असू शकत नाही असेच माझा म्हणणे आहे..परंतु राजकीय संस्था या धर्मनिरपेक्ष असल्याच  पाहिजेत........
  सर्व धर्मग्रंथ हे पूजनीय आदरणीय असले तरी ते सध्याच्या काळात २१ व्या शतकात आचरणीय नाहीत हे लक्षात घेणे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी उचललेले महत्त्वाचे  आणि निर्णायक पाऊल ठरेल .
धर्मनिरपेक्षता म्हणजे सामाजिक जीवनातील आपले निर्णय बुद्धीवादाच्या कसोटीवर आधारलेले असणे....... इहलौकिक जीवन हे बुधिवादावर अधिष्ठित असले पाहिजे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा